राशिवडे / प्रतिनिधी
राशिवडे गावामध्ये तोंडाला मास्क न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी शंभर रुपयेप्रमाणे सुमारे आठ हजारचा दंड वसुल करण्यात आला. दंडाची आकारणी केल्यानंतर संबधिताना मास्क देण्यात आला. या कारवाई मध्ये मंडलनिरिक्षक देवीदास तारडे, तलाडी सुनील खेडकर, सरपंच क्रष्णात पोवार, उपसरपंच अनिल वाडकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे यांच्यासह ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कारवाईस मुख्य बाजारपेठेतुन सुरुवात झाली. विनामास्क मोटरसायकल, चारचाकी आणि चालत फिरणाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मास्कचा वापर न करता दुकानदारांकडूनही प्रत्येकी शंभर रुपयेप्रमाणे दंड वसुल केला व संबधितांना मास्क देण्यात आला. बस स्टँड, रिक्षा स्टॉप, विरशैव बँक चौक, गणेश मंदीर चौकामध्ये या पथकाने कारवाया केल्या. या कारवाई केलेल्यांमध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे. तसेच सायंकाळी ७ नंतर दुकाने उघडी ठेवणार्यादुकानदार, हॉटेलमालक, पानटपरी मालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.