प्रतिनिधी /बेळगाव
मुलुंड, मुंबई येथे झालेल्या 27 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कंप्लीट कराटे अकादमीच्या कराटेपटूंनी विविध गटात यश संपादन केले. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातून 1200 कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या कंप्लीट कराटे अकादमीच्या कराटेपटूंनी भाग घेऊन चषक पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे हसन इस्माईल यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक देवून कंप्लीट कराटे अकादमीचे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांच्यासह संघाला गौरविण्यात आले. या स्पर्धेत आयुष निरव, ओंकार रावळ, ऋषिकेश सनदी, ओमकार पाटील, रमेश जावळे, साई मुंगारी, शितल कडोलकर, सोनिया कावळे, संस्कृती कावळे, कृष्णा जाधव, किसन टेनगिरी, विहान लक्ष शेट्टी, आशितोष संभाजीचे, उमेश कावळे, श्रीधर कदम, रणवीर बेळगावकर, शशांक तारीहाळकर, श्रेयस नाईक, कपिल चौगुले, ओमकार जास्तवाड, अस्मिता कळमणे, आशीर्वाद कळमणे, समिक्षा पाटील, ऋषिकेश पाटील, प्रज्वल पाटील, पृथ्वीराज मासाळकर, लक्ष परब यांनी सुवर्णपदके पटकाविली तर यश पाटील, प्रथम कांबळे, गौरी मेदार, सिद्धार्थ करांडे, मोहित करांडे, योगी निश्चित, आओगी युवराज मगदूम, दियाश्री एस बी, विश्वराज पाटील, एन. कंग्राळकर, सिद्दिक पावले, हरीश डोंगरे, गणेश टिपऱयांवर, अथर्व कुलकर्णी, कार्तिक मिरजे यांनी रौप्य पदके पटकाविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटेमास्टर जितेंद्र काकतीकर, रमेश अलगुडेकर, अक्षय प्रभुजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.