मोठय़ा प्रमाणात व्हिडीओ व्हयरल
प्रतिनिधी/ पणजी
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काल शनिवारी गोव्यात दाखल झालेले काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी चक्क भाडय़ाच्या मोटर सायकलवरून बांबोळी ते आझाद मैदानापर्यंत सुमारे पाच किलो मीटरचा प्रवास केला. तोंडाला मास्क व हेल्मेट परीधान करून मोटर सायकल पायलटच्या मागे बसले होते. आझाद मैदाना जवळ उतरल्यावर त्यांनी पायलटला योग्या ते भाडय़ाचे पैसेही दिले. रहुल गांधी यांचा हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी यांनी बांबोळी येथे रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका साध्या हॉटेलात जेवण केले. नंतर त्यांनी सुमारे पाच किलो मिटरचा प्रवास मोटर सायकल पायलट सोबत केला. शनिवारी सकाळी गोव्यात दाखल झालेल्या राहूल गांधी यांनी दक्षिण गोव्यातील मच्छिमाऱयांशी सवंद साधला त्यांच्य समस्याही जाणून घेतल्या. नंतर ते पणजीला आले त्यांच्या सोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. आझाद मैदानावर पोचल्यावर त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्प चक्र वाहिले तसेच आझाद मैदानावर नोकरीत कायम करण्याची मागणी साठी कंत्राटी शिक्षक धरणे धरून बसले आहेत त्यांचीही राहुल गांधी यांनी भेट घेतली.