27 ऑगस्टला विक्रीसाठी होणार उपलब्ध – 1 लाख 80 हजार किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दमदार दुचाकीच्या निर्मितीमध्ये कार्यरत असणारी कंपनी रॉयल इनफील्ड यांनी आगामी काळात आपली नवी क्लासिक 350 मोटारसायकल भारतीय बाजारात उतरविण्याची तयारी केली आहे.
सदरची नवी सुधारीत क्लासिक 350 27 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या गाडीत तांत्रिकसह इतर बदलही नव्याने करण्यात आले आहेत. मिटीओअर 350 चे इंजिन सदरच्या गाडीमध्ये बसविण्यात आलेले असून यामध्ये ट्रिपर टर्न-बायöटर्न नेव्हिगेशन याच्यासह चालकाच्या मदतीसाठी एक छोटी स्क्रिनही बसविण्यात आली आहे. नेव्हिगेशनसाठी चालकाला आपल्या स्मार्टफोनवरून ब्लुटूथचे माध्यम वापरता येणार आहे. सदरच्या गाडीची सुरुवातीची किंमत 1 लाख 80 हजार रुपये (एक्स शोरूम-अहमदाबाद) इतकी असणार असून 27 ऑगस्टपासून नवी क्लासिक विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
नियोजनावर पाणी
गेल्या जूनमध्ये येणाऱया आर्थिक वर्षामध्ये नवी दुचाकी सादर करण्याची कंपनीकडून घोषणा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक तिमाहीत एक नवे मॉडेल सादर करण्याचाही विचार कंपनीचा होता. पण देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम कंपनीच्या दुचाकी विक्रीवर दिसून आला. त्यामुळे कंपनीच्या नियोजनावर पाणी फेरले गेले. यामुळेच नव्या वाहनांचे लाँचींगही परिणामी लांबणीवर टाकण्याची वेळ कंपनीवर आली. जूनमध्ये लॉकडाऊन उघडल्यानंतर दुचाकींची विक्री वाढली आहे.