प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल अविनाश पोतदार उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्षा संगीता ठाकुर व त्यांच्या कार्यकारिणीला अधिकारसूत्रे देऊन कर्तव्याची जाणीव करून दिली. यावेळी माजी अध्यक्ष इरफान शेखअली यांनी नूतन अध्यक्षा संगीता ठाकुर यांना अधिकार सोपविले.
यावेळी अभयसिंग ठाकुर यांना बेस्ट रोटेरियन पुरस्कार देण्यात आला. डॉ. दशरथ बामणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपप्रांतपाल अजय हेडा, नूतन उपप्रांतपाल प्रकाश मिर्जी यांनी नूतन सदस्यांना मार्गदर्शन केले.
क्लबची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
खजिनदार चैत्रा गोरेबाल, सचिव विजय गाडवी, संचालक जी. एस. पाटील, उमेश गोरेबाल, इरफान शेखअली, श्रेयस नाकाडी, अरुण शिरगापूर, श्रीशैल हिरेमठ, उदयकुमार हवालदार, संतराम, सागर कोळी, प्रकाश पाटील, डी. टी. बामणे, अभयसिंग ठाकुर, सूरज ओझा, जगजीतसिंग.