बेळगाव : 2019- 20 सालाचे उत्कृष्ट रोटेरियन म्हणुन रो शरद पै यांना अलीकडेच सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो जीवन खटाव यांनी त्यांचा सन्मान केला. रोटरी क्लब ची उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या रोटरी सदस्याला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी शरद पै यांनी विविध उपक्रम राबवून रोटरी क्लबला उच्च स्तरावर नेले आहे त्यांनी एकस या उद्योगाच्या सहकार्याने सुमारे दीड कोटी रुपये खर्चून 25 हून अधिक शाळांमध्ये टॉयलेट बांधणे, बेंच बसवणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वॉश स्टेशन उभारणे यासारखी कामे केली. त्याचबरोबर वेगा हेलमेट्सच्या सहकार्याने सुमारे 75 लाख रुपये खर्चून वरील प्रमाणे कामे 10 शाळांमध्ये केली याशिवाय पॉलीहायड्रॉन, अशोक आयर्न व इतर उद्योजकांचे मदतीने बीम्स हॉस्पिटल यांना व्हेंटिलेटर व रोग तपासणी मशीन बसविल्या
याचबरोबर शरद पै रोटरी क्लबच्या अन्नोत्सव, पूरग्रस्त सहाय्य, कोविड पुनर्वसन यासारख्या कार्यात नेहमी सहभागी असतात. गेल्या तीस वर्षापासून ते रोटरी क्लबशी संलग्न असून 2014 -15 ला अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.अविनाश पोतदार व इतरांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्या सर्वांचे आभार मानले आहेत या पुरस्कार वितरण प्रसंगी रोटरीचे जीवन खटाव, प्रमोद अग्रवाल, डॉक्टर केळूसकर, गणेश देशपांडे ,वीरधवल उपाध्ये, डॉक्टर मनोज सुतार आदी सदस्य उपस्थित होते.
Trending
- फ्रान्समध्ये चाकूहल्ल्यात 4 बालके जखमी
- जपानमध्ये तरुणाईला हसण्याचे प्रशिक्षण
- अशोक लेलँडची मध्यम, अवजड वाहन विक्री पूर्वपदावर
- मणिपूरमध्ये लष्कराकडून शस्त्रास्त्रांची शोधमोहीम
- ‘गॅरंटीं’साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका
- भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद
- शक्तीभोग फूडस् खरेदीसाठी आयटीसीचे प्रयत्न
- डिलीव्हरीचा समभाग 24 टक्के तेजीत