प्रतिनिधी / बेळगाव
11 फेब्रुवारी रोजी पंजाब इथे होणाऱ्या आरआयएमटी युनिव्हर्सिटी आयोजित अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी संपूर्ण कर्नाटकातून सहा जणांची निवड झाली असून त्यामध्ये बेळगावच्या जीआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विश्वविक्रमवीर रोहन अजित कोकणे याची निवड झाली आहे.त्याने आजपर्यंत तीन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा किताब मिळवला असून चार वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे . तत्पुर्वी पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये स्लालम या स्केटिंग प्रकारात पदक मिळविले आहे. आता त्याची युनिव्हर्सिटी ब्लू म्हणून विश्वेश्वरय्या युनिव्हर्सिटीने निवड केली आहे. त्याला जीआयटीचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, प्रिंसिपल डी. ए. कुलकर्णी, जिमखाना चेअरमन रमेश मेदार आणि इतर स्टाफने शुभेच्छा दिल्या. रोहनला प्रशिक्षक श्री.सूर्यकांत हिंडलगेकर यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले आहे.
Related Posts
Add A Comment