प्रतिनिधी / जयसिंगपूर
पिडित मुलीच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन पिडीतेकडून 40 ते 44 तोळे सोने घानवट ठेवून लग्नाच्या तसेच लग्नाच्या कागदपत्रावर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्याप्रकरणी आठ जणांच्यावर जयसिंगपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार संशयित पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायालयात समोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यामध्ये संशयित आरोपी रेहान नदाफ, अनिकेत शिंदे, साहिल नदाफ, शाहरुख जमादार पोलिसांच्या ताब्यात असून रियाज राजापुरे, असलम हुसेन नदाफ, सचिन पाटील, ओंकार नार्वेकर हे चार जण अद्याप फरारी आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, यातील संशयित आरोपी यांनी हेरवाडे कॉलनी जयसिंगपूर येथील गडदे या फिर्यादीच्या ओळखीचा फायदा घेऊन रेहान नदाफ याने सुमारे 40 ते 44 होते सोने घेऊन येथील एका बँकेमध्ये गहाण ठेवले. व संशयित आरोपी असलम नदाफ रियाज राजापुरे व अनिकेत शिंदे यांनी गहाण ठेवलेले सोने सोडवून देतो असे सांगून मध्यस्थी केली होती. मात्र ते सोन्याचा मुद्देमाल सोडवून न दिल्याने फिर्यादी गडदे यांनी तगादा लावल्यानंतर संशयित आरोपी साहिल नदाफ, सचिन पाटील, ओमकार नार्वेकर, शाहरुख जमादार यांच्या मदतीने मुख्य संशयित आरोपी रेहान नदाफ याने येथील पीडित फिर्यादी गडदे यांना जबरदस्तीने जयसिंगपूर येथून जबरदस्तीने कुरुंदवाड येथे नेऊन लग्न केल्याच्या कागदपत्रावर जबरदस्तीने सह्या घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये भादवि कलम 366 ,420 ,506 ,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस कॉस्टेबल असलम मुजावर जावेद पठाण संदेश शेटे, रोहित डावाळे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.
Previous Articleराजारामपुरीतील मुक्ता पब्लिकेशनवर `आयकर’चे छापे
Next Article ‘त्या’ बोटींचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द
Related Posts
Add A Comment