ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर झालेल्या दोन्ही देशांच्या बैठकीत सीमारेषेवरील सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले होते. मात्र, तरी देखील चीनने पीपल्स लिबरेशन आर्मीचे 16 कॅम्प एलएसीच्या 9 किलोमीटर अंतरावर उभारले आहेत. तसेच पँगाँग टीएसओ भागात चीनने हेलिपॅडची उभारणी केल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे.
चीनने होतान, ग्यारी व शिगत्से या भागात देखील लढाऊ विमाने आणि बॉम्बर्स देखील आणले आहेत. एलएसीमध्ये भारतीय हद्दीत उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराला हा थेट धोका आहे. त्यामुळे धोकादायक चीनवर विश्वास न ठेवता भारतानेही पूर्ण युद्धसज्जता ठेवली आहे.
चीन फिंगर फोरवर दावा सांगत असून, त्यादृष्टीने चीनने तयारी सुरू केली आहे. भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग चीनने रोखून धरला आहे.