मुंबई / ऑनलाईन टीम
देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. आज, रविवारी महाराष्ट्राने एक नवीन विक्रम केला आहे. आतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना कोरोन लसीचा डोस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत आणखी वाढ होईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. या विक्रमाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.
कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असताना लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे. यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोपाची मालिका सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना देशात महाराष्ट्रालच कोरोना लसीचे डोस देत महाराष्ट्र सरकारचे आरोप फेटाळून लावले आहे.
Previous Articleसांगली : लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय करा : आमदार पडळकर, सदाभाऊ खोत
Next Article विशाखापट्टणममधील स्क्रॅपयार्डला भीषण आग
Related Posts
Add A Comment