केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे ‘ट्विट’- खासगी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बुधवारी मोठा निर्णय जाहीर केला. देशभरातील नागरिक आता आठवडय़ातील सातही दिवस कोणत्याही वेळी (24ƒ7) आपल्या सोयीनुसार कोरोना लस घेऊ शकणार आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱया टप्प्यास सुरुवात झाली असून 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्ये÷ नागरिकांना या टप्प्यात लस दिली जात आहे. त्याचबरोबर 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱयांनाही या टप्प्यात लस दिली जात आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा वाढविण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता 24ƒ7 कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात. त्यामुळे लसीकरण मोहीम व्यापक करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन लवकरच देश ‘कोरोनामुक्त’ होईल, असा दावा केला जात आहे.
कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशभरातील 1.54 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मंगळवारी देण्यात आलेल्या या आकडेवारीमध्ये 6 लाख 9 हजार 845 लसींचाही समावेश आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 4 लाख 34 हजार 981 लाभार्थ्यांचा आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील 60 हजार 20 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
ज्येष्ठांचे लस घेण्याचे प्रमाण गतिमान
कोरोना विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱयांना आणि त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना लसीकरणाची सुरुवात झाली होती. आता 1 मार्चपासून सर्वसामान्यांपैकी ज्येष्ठ नागरिकांना आणि व्याधींनी ग्रस्त 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. आता लसीकरणाला वेग आला असून देशाच्या काही भागात हे प्रमाण 250 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
राष्ट्रपतींनीही घेतला लसीचा पहिला डोस
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आर. आर. हॉस्पिटलमध्ये लस घेतल्यानंतर त्यांनी पात्र असलेल्या सर्वांना लसीकरणासाठी पुढे येणाचे आवाहन केले. यापूर्वी पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक वरि÷ मंत्र्यांनी लस घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनीही बुधवारी पहिला डोस टोचून घेतला. तसेच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पुरी यांनी यशोदरा सुपर स्पेशालिटीस्ट रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. राजकारण्यांप्रमाणेच अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि महनीय व्यक्तीही आता लस टोचून घेत असल्याने मोहिमेला अधिक व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे.