तरुण भारत संवाद प्रतिनिधी / लातूर
लातूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून आज तीन नवे रुग्ण आढळले आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेत 34 जणांचे कोरोना रिपोर्ट आले आहेत. यातील उदगीरच्या तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर उर्वरित निगेटिव्ह आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विधान संस्था लातूरचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
आज अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील २६ , चाकुर येथील १, लातूर येथील ७ असे एकूण ३४ कोरोना (कोविड) संशयितांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल आला आहे, त्यापैकी लातुरात व चाकुर येथील ७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उदगीर येथील १८जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर २ जणाचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. त्यापेकी या दोघांची ४८ तासानंतर तपासणी घेऊन पुनर्तपासणी करण्यात येईल, असंही ठाकूर यांनी सांगितले.