प्रतिनिधी / बेळगाव :
लिंगायत समाज हा बेळगाव शहरासह जिह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजाचा विकास होण्यासाठी लिंगायत विकास महामंडळाची स्थापना होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन या महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नावे देण्यात आले. बेळगाव शहर ग्रामीण भाग याचबरोबर जिह्यामध्ये हा समाज मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र बऱयाच ठिकाणी विखुरल्यामुळे समाज एकत्र येणे अवघड झाले आहे. याचबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिने लिंगायत महासभेने आजपर्यंत प्रयत्न केले आहेत. असे असले तरी सरकारनेच या मध्ये जातिने लक्ष घालणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱयांकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बसवसेना, जागतिक लिंगायत महासभा यासह विविध लिंगायत समाज संघटना उपस्थित होत्या. ऍड. बसवराज रोट्टी, राजू कुंदगोळ, अरविंद परशेट्टी, शंकर कुडस, अशोक मळगली यांच्यासह लिंगायत समजातील नागरिक उपस्थित होते.