पुणे / प्रतिनिधी :
१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाईंची १८९ वी जयंती आहे.
या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा करुन लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक शिक्षण साहित्यांचा उपयोग करित सावित्रीबाईंना आगळी-वेगळी आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, अद्वैता उमराणीकर यांनी मार्गदर्शन केले.