बेळगाव :जुने बेळगाव व बेळगाव येथील ‘लेट्स स्प्रेड हय़ुमॅनिटी’ या ग्रुपतर्फे गरजूंना अन्नधान्य व आहाराचे वाटप करण्यात येत आहे. शहरात सीबीटी बसस्टँड, किल्ला रोड, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प, रेल्वे स्टेशन कपिलेश्वर मंदिर परिसरात दररोज 200 ते 250 लोकांना अन्न पदार्थांचे वाटप केले जात आहे.
यासाठी श्रीनाथ अष्टेकर, सुधीर पाटील, गणेश अष्टेकर, इंद्रजीत तारिहाळकर, सुमित रेडकर, प्रवीण दोडमणी, कुनाल कांबळे, बाळकृष्ण मनवाडकर, मंजुनाथ शिरोळकर, ओमकार बेनके, स्वप्नील पाटील, पंकज कोकितकर, महेश लोहार, ज्ञानेश शिंदे व अष्टेकर परिवार साहित्य वाटप करीत आहेत.
या युवकांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जुने बेळगाव स्मशानभूमी, जुना धारवाड रोड, येळ्ळूर रोड, राजहंसगड येथे 70 झाडे लावण्यात आली.