डेनिम, कॉटन पँट्स, ट्राउझर्सपेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही लेदर पँट्सचा पर्याय निवडू शकता. या पॅंट खूपच ट्रेंडी दिसतात. लेदर पँटवर विविध पद्धतीचे आणि प्रकारचे टॉप्स घालता येतील. जॅकेट्स, श्रग कॅरी करून मस्त स्टायलिश लूक मिळवता येईल. तुमच्याकडे एखादी लेदर पँट असेल किंवा अशी पँट घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला स्टायलिंगचा फंडा जमायला हवा. लेदर पँट्स स्टाईल करण्याच्या या काही टिप्स…
* लेदर पँटवर टी शर्ट घालता येईल. तुम्ही स्लीव्हलेस टीही कॅरी करू शकता. बोल्ड लूकसाठी टी हा बेस्ट पर्याय आहे. बॉलिवूड सेलेब्जच्या लेदर लूकमधूनही तुम्हाला फॅशनच्या टिप्स मिळू शकतील. काळ्या लेदर पँटवर काळा टी खूप मस्त दिसतो. यासोबतच ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन करता येईल. काळ्या रंगासोबत इतर रंगांचे टीही घालता येतील.
* लेदर पँटवर कोणताही टॉप घालता येईल. पण हटके लूकसाठी पांढर्या किंवा गुलाबी रंगाचा पेप्लम टॉप घाला. पेप्लम टॉपमुळे लेदर पँटही खुलून दिसेल.
* लेदर पँटमध्येही थोडंफार वैविध्य पहायला मिळतं. टाईट फिटिंगवाल्या पँटसोबतच आरामदायी ढगळ पँट्सही मिळतात. लेदर पँटवर टी आणि जॅकेट घालू शकता.ं लेदरवर लेअरिंगचा फंडा वापरता येईल.
* लेदर पँटवर लेदर टॉप घालून लेदर ऑन लेदर लूक मिळवता येईल. * लेदर पँटवर छानसा टॉप घालून त्यावर लाँग जॅकेट किंवा केप घालता येईल.