ऑनलाईन टीम / लेह :
लडाखमधील लेहमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टल स्केल एवढी होती. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी मागील महिन्यात देखील लडाखमध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या महिन्यात 21 आणि 22 मेला सलग दोन दिवस भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.2 आणि 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता यापेक्षा अधिक म्हणजेच 4.6 रिश्टल स्केल एवढी आहे.