ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊनचा फटका अंतराळ संशोधन संस्था इस्रोलाही बसला आहे. लॉकडाऊन काळात अंतराळ मोहिमांसाठीची उपकरणे बनविणाऱ्या पार्ट्सची निर्मिती ठप्प असल्याने गगनयान, चांद्रयान-3 सह दहा महत्वकांक्षी मोहीमा रखडल्या आहेत. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सिवन म्हणाले, इस्रोने यंदा गगनयान, चांद्रयान-3 सह 10 प्रक्षेपणाच्या 10 योजना आखल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे अंतराळ मोहिमांसाठीची उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांकडून पार्ट्स उपलब्ध झाले नाही. उपकरणे बनविणारे सुष्म, लघु आणि माध्यम उद्योग सुरु होण्याची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत. चांद्रयान-3 सह आमचे अनेक प्रकल्प याच उद्योगांच्या उपकरणे पुरवठ्यावर अवलंबून आहेत.
इस्रोची चंद्रावर हिंदुस्थानी अंतराळवीर पाठविण्याची ‘गगन यान’ मोहीम 2022 मध्ये राबविण्यात येणार आहे. मात्र, उपकरणांची उपलब्धता करणारे प्रकल्प रखडल्याने आता त्यांच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता इस्रोप्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केली आहे.