प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून विजेचे वाढीव बील देण्यात आल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली असतानाच वाढीव विजेचे बील कसे भरायचे असा प्रश्न नागरिकांच्यासमोर आहे. त्यामुळे वाढीव बिलामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. लॉकडाऊनच्या फटक्मयामुळे वीज ग्राहकांना झटका मिळाला आहे.
मागील महिन्यात हेस्कॉमकडून सरासरी विजेचे बील देण्यात आले होते. त्यामुळे त्यातील उर्वरित रक्कम व या महिन्यातील बील देण्यात आले आहे. त्यामुळे एकूण रिडींग वाढल्याने या महिन्यात सर्वच ग्राहकांचे विजेचे बील वाढल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे काही जणांनी हेस्कॉमच्या कार्यालयात जावून वाढीव विजबीलाची तक्रार मांडली.
700 ते 800 रुपये दरमहिन्यात येणारे विजेचे बील या महिन्यात 1 हजार रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे हे विजेचे बील कसे भरायचे असा प्रश्न नागरिकांच्यासमोर आहे. हेस्कॉमने बील भरण्याची मुभा दिली असली तरी ते अधिक आल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
संजिव हणमण्णावर (सहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)
एप्रिल महिन्यापासून विजेचा वापर वाढला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्यामुळे विजेचा वापर दुप्पटीने वाढला. त्यामुळे विजेच्या बिलामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सरासरी बिलातील तफावतही या महिन्यात देण्यात आलेली नाही. बिलात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.