31 मे पर्यंत गुंतवणूक केल्यास ठेवींवर 11 टक्के व्याज दिले जाणार
प्रतिनिधी/ बेळगाव
सुरक्षितता सर्वप्रथम हे आपल्या आजच्या जगाचे आणि जगण्याचेही सूत्र झाले आहे. कोरोनामुळे एक नवेच जग आपण अनुभवले. सुरक्षितता मग ती आरोग्याची असो अथवा पैशाची असो. भारतीयांना तर या दोन्ही गोष्टींचे महत्त्व अधिक आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले. तसेच आपली आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असल्याने गुंतवणूक करण्यासाठी तशीच दर्जेदार आणि विश्वासार्ह सोसायटी म्हणजे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने सर्व सोसायटय़ांपेक्षा आपल्या ग्राहकांच्या ठेवीवर अधिक म्हणजेच 11 टक्के व्याज दिले. लोकमान्यवरील विश्वासामुळे ग्राहकांनी आपल्या ठेवी लोकमान्यमध्ये ठेवणे पसंत केले. आपल्या ठेवींवर 11 टक्के व्याज 31 मे पर्यंत दिले जाणार आहे. ही संधी ग्राहकांनी दवडू नये. कारण त्यानंतर व्याजदारात 1 टक्का कपात केली जाणार आहे.
सुरक्षितता आणि विश्वासार्हता हे सूत्र आदर्शवत मानणाऱया लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्ली या चार राज्यांत 217 शाखा व 4 हजार 800 कोटी रुपयांच्या ठेवीसह सहकार क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून लोकमान्य नावलौकिकास आली आहे.
पैशाची गुंतवणूक करताना आर्थिक फायदा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. हा अधिक फायदा घेण्याच्यादृष्टिने ग्राहकांनी 31 मे पूर्वी लोकमान्यमध्ये आपली आर्थिक गुंतवणूक करावी, असे आवाहन लोकमान्य सोसायटी करत आहे. ग्राहक नेहमीच लोकमान्यच्या पाठीशी राहिले आहेत. यावेळीही ते असाच पाठिंबा देतील, याची खात्री असल्याने लोकमान्य आपल्या सर्व ग्राहकांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करीत आहे.