150 अज्ञातांच्या शोकामध्ये झाली आहे सामील
जर तुम्ही कुणाच्या अंत्यसंस्काराला गेला असाल तर तुम्हाला तेथील वातावरणाची कल्पना असेल. रडणारे लोक, उदास चेहरे आणि सर्वत्र शांतता हेच चित्र दिसून येत. सर्वसाधारणपणे लोकांना अंत्यसंस्काराच्या वेळी जाणे फारसे पसंत नसते. स्वकीयांचे पार्थिक पाहणे अत्यंत वाईट अनुभव असतो. पण इंग्लंडमधील एका महिलेला अंत्यसंस्कारात जाणे पसंत आहे.
लंडनच्या इजलिंग्टनमध्sय राहणारी 55 वर्षीय जीन ट्रेंड हिल एक अभिनेत्री असून छायाचित्रण करणे हा तिचा छंद आहे. परंतु त्याहून हैराण करणारी बाब म्हणजे तिच्या एका अजब छंदामुळे ती चर्चेत राहते. जीनला अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्कारात सामील होणे पसंत आहे.
14 वर्षांची असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्या 6 वर्षांनी आईचेही निधन झाले. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यावर आईच्या अंत्यसंस्काराची तयारी मीच केली होती. तेव्हापासून कुटुंबातील लोक मला अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी बोलावतात. याचदरम्यान कुटुंबीयांच्या मृत्युमुळे दुःखी झाल्याने दफनभूमीतच स्वतःचा बहुतांश वेळ घालवू लागल्याचे जीनने सांगितले.
जीनने त्यानंतर दफनभूमीत जात लोकांची रेखाचित्रे आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. मागील 10 वर्षांमध्ये जीनने 150 हून अधिक अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्कारांमध्ये भाग घेतला आहे. दफनभूमीत गेल्यास मला आईवडिलांच्या जवळ गेल्याची अनुभूती होते. मी अत्यंत धार्मिक असून मेल्यावर आणखी एक जग असून तेथे लोक राहत असल्याचे मला वाटत असल्याचे जीन सांगते. जीन आता दफनभूमीच्या देखरेखीचे काम करते.