बेळगाव : विजयनगर जिल्हय़ातील होस्पेट येथील जेएमएफसी कोर्टच्या आवारातच एका वकिलाचा खून करण्यात आला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. वकिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार वाढले आहेत. तेंव्हा तातडीने याबाबत दखल घेऊन वकिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ऍड. तारिहाळ्ळी वेंकटेश असे त्या दुर्दैवी वकिलाचे नाव आहे. जेएमएफसी न्यायालयातच अशाप्रकारे दिवसाढवळय़ा खून झाला आहे. यामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत धोकादायक आहेत. वकील सुरक्षित नाहीत. त्यामुळे आम्ही काम कसे करायचे? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. वकिलांसाठी विशेष कायद्याची तरतूद करावी. याचबरोबर वकिलांना संरक्षण द्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नावाने शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ज्ये÷ वकील डी. एम. पाटील, ऍड. सुनीता पाटील यांच्यासह वकील उपस्थित होते.