प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव येथील ढोर गल्लीत बुधवारी श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. दरवषी दुर्गादेवी मंदिरामध्ये ढोर कक्कय्या महिला मंडळाच्यावतीने रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रारंभी श्री रामाच्या फोटोचे पूजन करून त्यांच्या जीवनावर आधारित कथा सांगितली.
जीवनामध्ये प्रत्येकांनी श्रीराम यांच्या नावाचा जप केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला अनेक अडचणी असतात त्या सहन करण्याची शक्ती दे, असे सोसायटीचे सदस्य चंद्रकांतराव यांनी सांगितले. मात्र यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अखिल कर्नाटक ढोर कक्कय्या महिला परिषदेच्या सदस्या स्नेहा विनायक कदम, शोभा मनोहर कदम, मीना श्रेयाकर,गीता कदम, शीला कदम, मीना श्रेयाकर, सुभाष नारायणकर आदी उपस्थित होते.