पेठ वडगाव/प्रतिनिधी
वडगाव पोलीस ठाण्याच्याजवळच असलेल्या दत्त इलेक्ट्रीक दुकान तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील २५ हजार रोख रक्कमेसह १ लाख पाच हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा असा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, वडगाव – हातकणंगले रोडवर पोलीस ठाण्यासमोर जवळच श्री दत्त इलेक्ट्रीक नावाचे दिलीप बाळकृष्ण झगडे (रा.पेठ वडगाव) यांचे दुकान आहे. हे दुकान बंद करून काल रात्री झगडे हे घरी गेले. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप कापून दुकानात प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम २५ हजार, १लाख ५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व पट्ट्या असा मुद्देमाल असा १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
दुकानात चोरी झाल्याचे सकाळी निदर्शनास आले असता झगडे यांनी वडगाव पोलिसात चोरीची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकास पाचारण केले होते मात्र श्वानपथक काही अंतरावरच घुटमळले. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जवळच असलेल्या दुकानात चोरी झाल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Previous Articleमुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा
Next Article शिरोळमध्ये सततच्या आजारास कंटाळून वृद्धेची आत्महत्या
Related Posts
Add A Comment