पंढरपूर / प्रतिनिधी
गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना नऊ दिवसांपूर्वी पितृशोक झाला होता. यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अस्थि आज पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये विसर्जित केल्या आणि धार्मिक विधी उरकून घेतले.
गुरुवारी सकाळी साधारण साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याचे उपमुख्यमंत्री कवळेकर आणि त्यांचे बंधू पंढरपुरात दाखल झाले. अचानक पणे चंद्रभागेच्या तीरावर पोलिस व सरकारी यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली नक्की काय घडते आहे. याबाबत नागरिकांमध्ये घबराट पसरली गेली. मात्र नंतर गोव्याचे उपमुख्यमंत्री अस्थीन विसर्जनासाठी पंढरपुरात आले आहेत आणि त्याकरता पोलिस बंदोबस्त लागला असल्याची माहिती उघड झाली.
गोव्याचे उपमुख्यमंत्री कवळेकर यांचे वडील राघू कवळेकर ( वय ७५) यांचे नऊ दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. वडिलांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी व धार्मिक विधीसाठी चंद्रकांत कवळेकर पंढरपूरात आले होते. विशेष म्हणजे ते चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या खाजगी भक्तनिवास मध्ये अगदी काही काळ वास्तव्यास होते. यानंतर साडेअकराच्या सुमारास हे पंढरपुरातून गोव्याकडे परतले. त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू बाबल कवळेकर उपस्थित होते.
Previous Articleपन्हाळा तालुक्यात आणखी १३ रुग्णांची भर
Next Article जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह
Related Posts
Add A Comment