मुंबई : वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(सीईओ) नवनीत नाक्रा यांची निवड करण्यात आली आहे. नाक्रा यांना पदभरतीत बढती मिळाली आहे. वनप्लस इंडियामध्ये नाक्रा यांनी फेब्रुवारी 2020मध्ये उपाध्यक्ष म्हणून आपल्या नोकरीला सुरुवात केली. चीफ स्ट्रेटेजी ऑफिसरनंतर त्यांना सीईओ बनविण्यात आले आहे. त्यांनी आपला या अगोदरचा कालावधी यशस्वीपणे सांभाळल्याने त्यांना बढती मिळाली असल्याची माहिती आहे.