प्रतिनिधी/सांगली
दक्षिण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या पद्धमविभूषण वसंतदादा सिव्हिल हॉस्पिटल च्या मुख्य इमारतीचे छत ढासळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी बरेकॅट लावून हा भाग बंद केला. वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात रात्री या ठिकानावरून कोणीही गेले नसल्याने मोठी हानी टळली आहे. सोमवारी मध्यरात्री रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सध्या वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. या पोर्च मधून दररोज हजारो रुग्ण तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, आरोग्य सेवक व इतर दवाखान्यातील कर्मचारी जात असतात. हा पोर्च गेल्या काही दिवसापासून मोडकळीस आला होता. त्याची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्याने पोर्चचा पुढचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Previous Articleशेरीया वाद निवारण मंचची स्थापना
Next Article भाजपतर्फे धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली
Related Posts
Add A Comment