प्रतिनिधी / वाकरे
करवीर तालुक्यातील भामटे, चिंचवडे, कळंबे गावचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या मंदिर परिसरातील चिंचवडे तर्फ कळे येथील दरीमध्ये लागलेली आग परिसरातील नागरिक व तरुणांनी विझवली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे जैवविविधतेचे होणारे नुकसान टळले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की सोमवारी दुपारच्या सुमारास वाघजाई डोंगराच्या पश्चिमेस असणाऱ्या चिंचवडे येथील दरीमध्ये आग लागली होती. सदरची आग अन्यत्र पसरली असती तर जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले असते. मात्र परिसरातील नागरिक व तरुणांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पंडित पाटील (चिंचवडे), कु.लहु पाटील (भामटे),गजानन साळोखे यांनी ही आग आटोक्यात आणल्याने दोन महिन्यात सातत्याने वाघजाई मंदिर परिसरातील डोंगराला आग लावण्याचे प्रकार होत आहेत. असे प्रकार नागरिकांनी करू नयेत असे आवाहन वाघजाई वनसंवर्धन समितीचे प्रमूख पर्यावरणप्रेमी जे.एन.पाटील यांनी केले आहे.

