घरावरील छपरे उडाली,विजेचा लोळ घरात घुसून हानी,बागायतींची मोठय़ा प्रमाणात हानी ,अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे कृषी अधिकाऱयांचे स्पष्टीकरण,केळी जमीनदोस्त, सुपारीला गळती

प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयाला सोमवारी रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. ठिकठिकाणी नैसर्गिक पडझड झाली असून वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीज खात्याची मोठी हानी झाली. अनेक ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरले होते. नगरगाव परिसरात रस्त्यावर झाडांची पडझड झाल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. अनेक घरांची कवले उडून छपरांचे मोठे नुकसान झाले. केळी, सुपारी बागायतीची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अजूनपर्यंत विभागीय कृषी कार्यालयाकडे उपलब्ध झालेली नाही.
सोमवारी दिवसभर उष्णेताचा पार चढला होता. त्यामुळे संध्याकाळी पाऊस हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत होता.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हलक्मया सरी कोळण्यात सुरुवात झाली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱयासह पाऊस लागून म्हाऊस, ठाणे, नगरगाव, सावर्डे, खोतोडा आदी पंचायत क्षेत्रातील अनेक गावांना फटका बसला आहे.
सावर्डे, वेळगे भागातील घरांना फटका
अनेक गावांना वादळी वाऱयाचा फटका बसला आहे. सावर्डे व खोतोडा पंचायत क्षेत्रातील काही घरांचे नुकसान झाले आहे. सावर्डे येथील देऊ झोरे यांच्या घराचे छप्पर उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. ही घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक वादळीवारा आल्यामुळे आपल्या घराचे छप्पर उडून गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यामुळे घरातील सामानाचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. याबाबतची माहिती आपण सत्तरीचे मामलेदार व उपजिल्हाधिकाऱयांना देणार आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. वेळगे येथील शांती गावकर यांच्या घरावर वीज कोसळून घराची हानी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. घराच्या शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडावरून विजेचा लोळ शांती गावकर यांच्या घरात घुसून नुकसानी झाली. या भागाचे पंच सदस्य तथा खोतोडा सरपंच राजेश पर्येकर यांनी दिली.
केळी, सुपारी, काजू बागायतीची नुकसानी.
वादळी वाऱयाचा फटका शेतकरी बांधवाना मोठा बसला आहे. नगरगाव, सावर्डे, म्हाऊस व ठाणे पंचायत क्षेत्रातील शेती बागायतीचे नुकसान झाले. केळी सुपारी व काजू बागायतीचे बऱयाच प्रमाणात नुकसान झालेले आहे. वादळी वाऱयामुळे केळीची झाडे जमीनदोस्त झाली तसेच सुपारीचीही मोठय़ा प्रमाणात गळती झाली आहे. त्याचप्रमाणे वादळी वाऱयामुळे काजू बागायतीतील काजू बोंडांचे मोठय़ा प्रमाणात गळती झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱयांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा : कृषी अधिकारी
दरम्यान, वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. मात्र बऱयाच ठिकाणी वादळी वाऱयामुळे शेती बागायतांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वादळीवाऱयाने नुकसान झालेल्या शेतकऱयांनी त्वरित विभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वीजपुरवठा गायब
वादळी वाऱयामुळे वीज वाहिन्यांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गायब झालेला वीजपुरवठा मंगळवारी दुपारी दोन वाजता सुरळीत झाला. दरम्यान वीज खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला; मात्र वीज खांबांची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भाचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत होईल, असल्याचे वीज अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम
वादळी वाऱयामुळे ग्रामीण भागात जाणाऱया अनेक रस्त्यांवर झाडे कोसळली ही झाडे बाजूला करताना अग्निशामक दलाच्या जवानांची दमछाक झाली. सावर्डे व नगरगाव पंचायत क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिर झाल्यामुळे दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी उर्वरित झाडे बाजूला करून सर्व रस्ते मोकळे केले, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.