वारणानगर / प्रतिनिधी
सांगली – कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या चिकुर्डे – कोडोली ता. पन्हाळा येथील पुलाखाली वारणा नदी पात्रात दोन मगरीचा मुक्त संचार आज नागरिकांना पहायला मिळाल्या असून नागरीकानी सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सातवे येथे शेतकऱ्यावर मगरीने हल्ला करून दोन एक महिण्याचा काल उलटला आहे आज मगरीचे पुन्हा अस्तित्व दिसल्याने वारणा काठच्या गांवाना मगरीचा धोका कायम राहिला आहे. चिकुर्डे – कोडोली पुलावर सद्या कोडोली – कुरळप पोलीस ठाण्याचे कोरोणाच्या परिस्थितीवर जिल्हा बंदीमूळे पोलीस चेकपोष्ट आहे. पोलीस रात्र दिवस पहारा करीत आहेत या ठिकाणी चांगल्या प्रखर विद्युत झोताची प्रकाश व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली असून दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरील वारणा नदीवर चिकुर्डे – कोडोली या पुलावर नागरीकांना ये – जा करण्यास एकमेव पोलीस चेकपोष्ट असल्याने ये – जा करण्यासाठी नागरिकांची देखील दिवस रात्र कायम वर्दळ आहे त्यामूळे मगरीचा धोका नागरिकांना देखील वाढला असून वन विभागाने नदीपात्रात शोध मोहीम राबवून मगरी पकडून त्यांचा योग्य ठिकाणी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.