इस्लामपूर/प्रतिनिधी
वाळवा तालुक्यात सोमवारी कोरोनाचा कहर झाला. वाळवा पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने घबराट पसरली. तर तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पंचायत समिती इमारत सॅनिटायझर करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली.
रविवार अखेर तालुक्यात तुरळक रुग्ण सापडत होते. पण सोमवारी हादरा बसला.चिकुर्डे येथील ४५ वर्षीय महिला, १९ वर्षीय युवती व १४ वर्षाचा मुलगा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.ताकारी येथील ३८ वर्षीय महिले सह ८ व १५ वर्षीय मुले व चार वर्षाच्या मुलीस कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, भवानीनगर येथील ७० वर्षीय वृद्धा व ४२ वर्षाचा पुरुष तसेच आष्टा येथील ६२ वर्षीय वृध्द यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.कासेगाव येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली.यामध्ये ७८ वर्षीय वृद्ध,७५ वर्षीय वृद्धा आणि ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ढवळी येथील ४५ वर्षीय पुरुष,भडकंबे येथील ५ वर्षीय बालक व मसूचीवाडी येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आले. काळमवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वाळवा पंचायत समितीत कार्यरत असलेल्या उपअभियंता यांना कोरोनाची बाधा झाली. ते सांगलीहून ये-जा करीत होते.त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Articleआता साताऱ्यात गृह विलगीकरण सुरु होणार
Next Article कोल्हापूर : गांधीनगरमध्ये कोरोनाने महिलेचा मृत्यू
Related Posts
Add A Comment