प्रतिनिधी / बेळगाव
वाहतूक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षकासह आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. तर जिल्हय़ातील 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहरातील 6 जणांसह एकूण दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत जिल्हय़ातील 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 21 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरातील 19 व ग्रामीण भागातील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी बहुतेकांवर त्यांच्या त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.
जयनगर, शास्त्राrनगर, जेएनएमसी कॅम्पस, हिंदवाडी, बसवाण गल्ली, सदाशिवनगर, कचेरी गल्ली, शहापूर, कोनवाळ गल्ली, कंग्राळी बी. के., मठ गल्ली, जालगार गल्ली येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी जिल्हय़ातील 433 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपासून स्वॅब तपासणी बंद असल्यामुळे सोमवारी केवळ 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बेळगाव शहरातील काही अधिकारी व पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. खासकरून लॉकडाऊनच्या काळापासून आतापर्यंत ऊनपावसाची तमा न बाळगता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सेवा बजावणाऱया वाहतूक पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. वाहतूक दक्षिण विभागातील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अहवाल पॉझिटिव्ह आलेले अधिकारी व पोलिसांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही सोमवारी दिवसभर दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचे कामकाज सुरू होते. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ते रविवारीपर्यंत सेवेवर होते.
सोमवारी सायंकाळपासून स्वॅब तपासणी सुरू झाली असून मंगळवारी अधिकाधिक अहवाल बाहेर पडण्याची शक्मयता आहे. गेल्या पंधरवडय़ात रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल कोरोनाबाधितांनी हाऊसफुल्ल झाले आहे. केवळ लक्षणे असणाऱयांवरच सिव्हिलमध्ये उपचार करण्यात येत असून लक्षणे नसणाऱया बाधितांवर कोविड केअर सेंटर व त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.
कुटुंबीयांचीही होणार तपासणी
सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकातील आठ अधिकारी व पोलिसांच्या कुटुंबीयांचीही स्वॅब तपासणी होणार आहे. मंगळवारी या पोलिसांच्या निकट संपर्कातील सहकाऱयांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार असल्याचे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. सर्व आठ जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
बेळगावात 6 जण दगावले
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बेळगाव शहर व उपनगरातील सहा जणांचा समावेश आहे. गोकाक, रामदुर्ग, हुक्केरी, खानापूर येथील बाधित व संशयितांचाही मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे.
आणखी 317 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 317 हून अधिक स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 2 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 3 हजार 172 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 8 हजार 371 जण चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत.