अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट ‘पुष्पा’साठी समांथा रुथ प्रभूने ओ अंटावा या गाण्यावर नृत्य केले होते आणि ते अत्यंत लोकप्रिय ठरले होते. समांथा आता अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा आगामी चित्रपट ‘लायगर’मध्ये स्वतःचे दुसरे आयटम साँग करणार आहे.

लायगरच्या दिग्दर्शकाकडून एका आयटम साँगसाठी समांथाशी संपर्क साधण्यात आला आहे. लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे विजय देवरकोंडासोबत पडद्यावर गाजू शकेल अशा अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. ओ अंटावा या गाण्यातील समांथाचे नृत्य पाहून दिग्दर्शकाने तिची निवड करण्याचा विचार गांभीर्याने चालविला आहे. ओ अंटावा हे गाणे नंबर वन ट्रेंडिंग साँग ठरले आहे. परंतु समांथा लायगर चित्रपटात दिसून येणार याची पुष्टी झालेली नाही.
ओ अंटावा हे गाणे केवळ तमिळच नव्हे तर अन्य भाषिकांनीही अत्यंत पसंत केले आहे. इन्स्टाग्रामवर लोकांनी रील तयार करून गाण्याला टॉप मोस्टवर आणून ठेवले आहे. ओ अंटावा हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी लिहिले आहे. तर इंद्रावती चौहान यांनी ते गायले आहे. समांथाने या गाण्यावर नृत्य करण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये आकारल्याचे बोलले जाते.