ऑनलाईन टीम / ब्रिटिश :
भारत सरकारने फरार घोषित केलेला मद्य सम्राट विजय मल्ल्याला ब्रिटिश हाय कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. इंग्लंड हाय कोर्टाने विजय मल्ल्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
किंगफिशर एअरलाईन्सने भारतातील अनेक बँकांकडून घेतलेल्या नऊ हजार कोटींच्या आर्थिक गुन्ह्यासाठी विजय मल्ल्या आरोपी आहे.
आता हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधातील अंतिम निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण गृहसचिव प्रीती पटेल यांच्या कडे जाणार आहे.
दरम्यान, 31 मार्च रोजी विजय मल्ल्या ने ट्विट करत म्हटले होते की, मी बँकांना त्यांचे पूर्ण पैसे देण्याची ऑफर अनेकवेळा दिली आहे. पण माझे ऐकून घेण्यास इडी तथा बँका तयार नाही आहेत.
रॉयल कोर्टमध्ये जस्टिस स्टीफन इविन आणि जस्टिस एलिझाबेथ लाईंग च्या द्वी सदस्य खंडपीठाने ही याचिका आज फेटाळून लावली आहे.