मुलाखतीला येताना नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील हंगामी पदासाठी 24 डिसेंबर 2021 रोजी होणाऱया मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विद्यापीठ प्रशासनाने डीएसटी-पर्स फेज-2 आणि रूसा प्रकल्पांतर्गत हंगामी पदांसाठी आज (दि.14) पासून समक्ष मुलाखतीला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
शिवाजी विद्यापीठातील हंगामी पदांसाठी 16 डिसेंबर 2021 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 24 डिसेंबर 2021 रोजी डी.एस.टी.पर्स फेज-2 व रूसा या प्रकल्पाअंतर्गत हंगामी पदांच्या समक्ष मुलाखती होणार होत्या. परंतू 23 डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार सदर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या मुलाखतींना आजपासून सुरूवात होईल, तरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे.
मुलाखतीचे पद व तारीख
डी. एस. टी. पर्स फेज-2
-संगणकचालक तथा कनिष्ठ सहाय्यक (खुला प्रवर्ग) : 14 जानेवारी रोजी मुलाखती
-संगणकचालक तथा कनिष्ठ सहाय्यक (अनुसुचित जाती) : 15 जानेवारी रोजी मुलाखती
रूसा प्रकल्पांतर्गत हंगामी
-रोजंदारी कनिष्ट लेखनिक : 17 जानेवारी रोजी मुलाखती
मुलाखतीला येतानाचे नियम व अटी
विद्यापीठात समक्ष मुलाखतीला येताना सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के उमेदवारांनाच प्रतीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. उमेदवारांचे पालक अथवा सोबत कोणासही प्रतीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जाहिरातीमधील कागदपत्रांबरोबर अर्जासोबत उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जोडणे आवश्यक आहे. कोरोना नियमानुसार मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे.