ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपने चार नावे निश्चित केली आहेत. यावेळी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या नेत्यांचे पुनवर्सन लांबल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि डॉ. अजित गोपछडे हे भाजपचे विधानसभेचे चार उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून ही नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपचे जुने आणि निष्ठावान समजले जाणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांचा भाजपने पत्ता कट केला आहे.
विधानसभेच्या 9 रिक्त जागांसाठी येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत.