मुंबई \ ऑनलाईन टीम
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय खलबतं झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच विधानसभा अध्यक्ष पदाची जागा ही काँग्रेसचीच आहे. तसेच यासंदर्भात तिनही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.
शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. पण पुढचा कार्यक्रम कसा करायचा याबाबत चर्चा झाली. असा आग्रह आहे की, काही प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. यासंदर्भात चर्चा झाली. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेसचीच जागा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो तिनही पक्षांनी एकत्र मिळून घ्यावा आणि त्या पदासाठी योग्य तो उमेदवार त्यांनी निवडावा, असे देखील ते म्हणाले.
दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायदा पटलावर येण्याची शक्यता कमीच आहे. पण आलचं तर मात्र सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. तसेच कृषी कायद्यांबाबत अनेकांनी काही बदल सुचवले आहेत. कृषी कायद्याबाबत राजू शेट्टी मागणी केली होती. तसेच महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारनं पारित केलेल्या तिनही कायद्यांबाबत अनेक तक्रारी आहेत. महाराष्ट्रात हे कायदे मंजूर करण्यासाठी जे आक्षेप आहेत. त्याबाबत चर्चा करावी हा संवाद त्यांनी सुरु केला आहे. याच तरतूदींबाबत सध्या चर्चा सुरु असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
Add A Comment