पिडीतेच्या पतीची पोलीस अधीक्षकांकडे तकार
प्रतिनिधी/रत्नागिरी
पत्नीची छेडछाड करून विनयभंग करणार्या संशयित आरोपींना मंडणगड पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीत महिलेच्या पतीने केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तरी या घटनेचा सखोल तपास करून संशयित आरोपींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी तक्रारदार यांनी अर्जात केली आहे.
मंडणगड तालुक्यातील लाटवण येथे 44 वर्षीय विवाहित महिलेची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना मार्च ते जून 2019 दरम्यान घडली होती. याप्रकरणी पिडीत महिलेने 4 संशयित आरोपीविरूद्ध मंडणगड पोलिसांत धाव घेत तकार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सईद मुसा खलपे (मृत), निसार हसन वलेले, नजीर हसन वलेले व परवेज वलेले (सर्व. रा. लाटवण मंडणगड) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान वर्ष उलटून देखील पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली नाही. तसेच कोणतीही ठोस कारवाई पोलिसांनी केली नाही. या उलट आरोपींना पोलीस निरीक्षकांच्या ऑफिसमध्ये नेवून चहापान करण्यात आले असा आरोप या पिडीत महिलेच्या पतीने केला आहे. आपल्या जीवाला धोका असून सातत्याने आरोपींकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे तरी वरील सर्व बाबींचा विचार करून आपल्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी या तक्रार अर्जात पिडीत महिलेच्या पतीने केली आहे.
Previous Articleहुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली
Next Article फ्रान्समधील बिघडलेले सामाजिक वातावरण
Related Posts
Add A Comment