प्रतिनिधी / रत्नागिरी
मिरकरवाडा बंदरात दोन पर्ससीन नौकांना मंगळवारी सुमारे 8 ते 9 टन कोकेरी माशांची बंपर लॉटरी लागली आहे. सुमारे 15 ते 20 किलोचा एक नग असलेला हा मासा 100 ते 150 रुपये पतिकिलोने विकला गेल़ा मात्र हे घबाड पकडणाऱया दोनही नौकांजवळ पर्ससीन मासेमारीचा परवाना नसल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. त्यामुळे पारंपरिक-पर्ससीनच्या संघर्षात पारंपरिक ‘पारंपरिक मच्छीमार उपाशी तर पर्ससीन तुपाशी’ असल्याची परिस्थिती पुन्हा समोर आली आह़े यामुळे विनापरवाना मासेमारी करणाऱया नौकांवर कारवाई करण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आह़े
1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या चार महिन्यामध्ये पर्ससीन मासेमारीला परवानगी आह़े या कालावधीत केवळ वैध पर्ससीन नौकांना मासेमारीची परवानगी असताना पर्ससीन मासेमारीचा कोणताही परवाना नसलेल्या पर्ससीन नौका मासेमारी करत असल्याचे दिसत आह़े कोणताही परवाना नसताना अवैधरित्या होणाऱया मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले आहेत़ शासनाच्या सर्व अटींचे पालन पारंपरिक, गिलनेट, ट्राँलिग मालक करुन मासेमारी करतात़ मात्र कोणताही वैध परवाना नसलेल्या पर्ससीन नौका पारंपरिक मच्छीमारांचा घास हिरावत आहेत़ त्यामुळे परवाना नसलेल्या नौकेवर कारवाईची मागणी मच्छीमारांनी केली आह़े
मत्स्य विभाग हतबल
एकीकडे मत्स्य विभागाचे अधिकारी परवाने नसलेल्या काही नौकांवर कारवाई करत आह़े काही दिवसापूर्वीच मिरकरवाडा बंदरात परवाना नसलेल्या 3 नौकांवर परवाना अधिकारी ड़ॉ रश्मी आंबुलकर-नाईक यांनी धडक कारवाई करत 31 हजारांचा दंड वसूल केला होत़ा अशा वेळी मात्र या अनधिकृतपणे पर्ससीननेट द्वारे मासेमारी करणाऱया नौका त्यांच्या नजरेतून सुटल्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहेत.
मिरकरवाडा बंदरात अनेक मिनी पर्ससीन नौका, पर्ससीननेट नौका बिनदिक्कत ये-जो करत असतात मासेमारी करत असतात अशा नौकावर बंदरात आल्यावर कारवाई करणे सहज शक्य आहे मात्र अपुरे मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक गस्ती नौकेच्या कमतरतेमुळे परपांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करताना मत्स्य विभागाला मर्यादा येत आहेत़ अशी उगाच ओरड मत्स्य खाते करते असा आरोप पारंपरिक मच्छीमार तसेच त्या संघटनाचे नेते करत असतात. असे असताना रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांच्याकडे सिंधुदुर्ग जिह्याचाही सहाय्यक मत्स्य आयुक्तपदाचा भार असल्याने आठवड्यातील काही दिवस ते सिंधुदुर्ग जिह्यात तर काही दिवस रत्नागिरी जिंह्यात असल्यामुळे मत्स्य आयुक्तांची दमछाक होत आह़े
Previous Articleमंडणगड पंचायत समिती सभापतीपदी स्नेहल सकपाळ
Next Article सांगली जिल्ह्यात 154 नवे रूग्ण, 224 कोरोनामुक्त
Related Posts
Add A Comment