मुंबई \ ऑनलाईन टीम
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीमध्ये कोरोना झालेल्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटल्याचं समोर आलं होतं. यावर आता राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राजेश टोपे म्हणाले की, माध्यमं देखली मला पाहत आहेत व राज्यातील जनता देखील मला पाहते आहे. माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझं कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेलं आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मनात जे विचार असतात, ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तुम्ही मला आजच पाहात आहात असं नाही, वर्षभरापासून कोविड काळात देखील पाहात आहात. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देणारा मंत्री मीच होतो. सर्व माध्यमांना मी प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये स्पष्ट सांगितलं की ही अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना आहे. हृदयला अतिशय पिळवटून टाकणारी घटना आहे. मृत्यू झालेल्यांच्या परिवारातील लोकांच्या दुःखाद आम्ही मनापासून सहभागी आहोत. या सगळ्या परिस्थितीत जे काही शासनाने करणं शक्य आहे ते सर्व आम्ही करणार आहोत. हे सगळं मी सकाळीच सर्व माध्यमांना सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींची कडक तपासणी होईल, जिथे निष्काळजीपणा आढळून येईल तिथे कारवाई होईल. मात्र शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील.
पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं म्हटले होते. यावरून काही भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
Trending
- Sangli Breaking : तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून.
- 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
- माणसातला देवमाणूस ! डॉ . ज्ञानेश्वर दुर्भाटकर
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !