विवाहासंबंधी प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या प्रथा आणि परंपरा आहेत. भारतातही विवाहावरून अनेक प्रथा परंपरांचे पालन केले जाते. पण जगात एका ठिकाणी अशा परंपरेचे पालन पेले जाते, ज्याबद्दल कळल्यावर दंग व्हायला होते.
पश्चिम आफ्रिकेत एक आदिवासी समुदाय आहे, जेथे विवाह करण्यासाठी इतरांच्या पत्नीला चोरून न्यावे लागते. येथे प्रथेमुळे लोक एकमेकांच्या पत्नींना चोरून नेत विवाह करतात.

पश्चिम आफ्रिकेच्या वोदाब्बे समुदायाचे लोक परस्परांच्या पत्नींना चोरून नेत विवाह करतात. अशाप्रकारचा विवाह हीच या समुदायाच्या लोकांची ओळख्घ् आहे. या समुदायाच्या लोकांमध्ये परस्परांच्या पत्नींची चोरी करण्याची अजब परंपरा आहे. या समुदायाच्या लोकांचा पहिला विवाह कुटुंबीयांच्या मर्जीने करविला जातो, पण दुसरा विवाह करण्याची प्रथा काहीशी वेगळी आहे. या समुदायात दुसऱया विवाहासाठी अन्य कुणाच्या पत्नीची चोरी करावी लागते. जर असे केले नाही तर दुसरा विवाह करण्याचा अधिकार देखील मिळत नाही.
या समुदायाच्या लोकांदरम्यान दरवर्षी गेरेवाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. या आयोजनादरम्यान युवक सजून-नटून स्वतःच्या चेहऱयाला रंग लावून घेतात. त्यानंर सामूहिक आयोजनात नृत्य अणि विविध प्रकारे इतरांच्या पत्नींवर भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला जातो. पण यादरम्यान संबंधित महिलेच्या पतीला जाणीव होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. यानंतर एखादी महिला अन्य पुरुषासोबत पळून गेल्यास त्या समुदायाचे लोक दोघांनाही शोधून त्यांचा विवाह लावून देतात. या दुसऱया विवाहाला प्रेमविवाह म्हणून स्वीकारले जाते.