कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करत शिवजयंती उत्साहात : महिलावर्गाने गायिले पाळणागीत : शिवमूर्तीचे विधिवत पूजन
लक्ष्मी रोड, शहापूर येथील महागणपती युवक मंडळ

लक्ष्मी रोड, शहापूर येथील महागणपती युवक मंडळाच्यावतीने महागणपती मंदिरात शिवजयंती साजरी करण्यात आली.काही निवडक कार्यकर्ते व महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महिलांनी पाळणागीत म्हटले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. सामाजिक अंतर पाळून हा कार्यक्रम पार पडला.
दुर्गाशक्ती महिला मंडळ, समर्थनगर

समर्थनगर, विनायक मार्ग येथील एकदंत युवक मंडळ संचालित दुर्गाशक्ती युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रजत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अशोक खवरे यांनी आरती म्हटली.
यावेळी निर्मल कणेरी, सुधाकर कडोलकर, विनायक कणेरी, राजू गावडे, गिरीष कणेरी, विजय भोगण, पवन देशपांडे, लखन कणेरी, विनय वेताळ, किरण लंगरकांडे, ओमकार देवण, निलेश गावडे, रमेश चौगुले, तसेच महिला उपस्थित होत्या. अरुण गावडे यांनी आभार मानले.
कृषी कॉलनी, भाग्यनगरमध्ये बालचमूंकडून शिवजयंती

कृषी कॉलनी, भाग्यनगर येथील काकडे बंधूंच्या निवासस्थानी कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून भगिनी निवेदिता बच्चा कंपनीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मुलांनी प्रेरणागीते सादर केली. अवनी हळदणकर हिने ‘आग्य्राहून सुटका’ ही कथा सांगितली. सर्वांनीच कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. आरव गोडसे, शरयु कुलकर्णी, दीपिका व निसर्गा कामकर, सान्वी हेब्बाळकर, अवनी हळदणकर यांनी यामध्ये भाग घेतला.