सांगली / प्रतिनिधी
मार्केटयार्ड मधे व्यापा-यांची रोख रक्कम पळवून नेणार्या टोळीला तातडीने पकडून दहा लाख रुपये वसूल केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचा भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी ,अभिजीत सोनवणे, पंकज प्रसादे, सारंग केळकर हे यावेळी उपस्थित होते.