प्रतिनिधी / कोल्हापूर
विश्वचषक नेमबाजीत राही सरनोबतने रौफ्य पदकाला गवसणी घातली. तिने 25 मीटर पिस्तूल प्रकारात या पदकाची कमाई केली आहे. या क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौफ्य व कास्य ही तिनही पदके पहिल्यांदाच भारताने पटकविण्याची लिलया साधत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भारताला तिहेरी मुकुट
कोल्हापूरच्या राही जीवन सरनोबत हिने रौफ्य पदकाची कमाई करून कोल्हापूरच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल क्रीडा प्रकारात पिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबत रौफ्य तर मनू भाकेर कास्य पदक पटकविल्याने तिनही पदके भारताला मिळाली आहेत. तिनही पदके मिळविण्याची पहिलीच घटना आहे. यामुळे पिस्तल क्रीडा प्रकारात भारताला तिहेरी मुकूट मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजीतील राहीची यशस्वी कामगिरी
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतने राष्ट्रकुल स्पर्धा 2008 सालापासून आजअखेर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी वाटचालीचा आलेख चढता ठेवला आहे. तिने नेमबाजी 25 मिटर पॉईंट टु टु स्पोर्टस पिस्तूल प्रकार विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये 2008 युवा राष्ट्रकुल स्पर्धा – सुवर्ण, 2010 राष्ट्रकुल स्पर्धा – सुवर्ण, रौफ्य, 2011 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा (अमेरिका) – कास्य, 2012 लंडन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सहभाग (या क्रीडा प्रकारात सहभागी होणारी प्रथम भारतीय महिला), 2013 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा दक्षिण कोरिया – सुवर्ण (विश्वचषक स्पर्धेत पिस्तूल नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाजी प्रथम भारतीय नेमबाज), 2014 राष्ट्रकुल स्पर्धा – सुवर्ण, 2014 साली महाराष्ट्र शासनाने विशेष सन्मान म्हणून थेट उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती केली., 2014 आशियाई क्रीडा स्पर्धा- कास्य, महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार – 2014, 2018 केंद्र शासनाच्या क्रीडा स्पर्धा जकार्ता, इंडोनिशिया – सुवर्ण (आशियाई क्रीडा स्पर्धेत पिस्तूल नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी प्रथम महिला भारतीय नेमबाज), 2018 केंद्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव, 2007 पासून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय एकुण पदके – 100 पेक्षा अधिक, 2019 विश्वचषक नेमबाज स्पर्धा, म्युनिक, जर्मनी – सुवर्ण पदक आणि 2020 टोकियो ऑलिंम्पिक साठीचा कोटा. आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी पिस्तूल प्रकारात स्पर्धेत रौफ्य पदकाची कमाई आदींचा समावेश आहे.
Previous Articleमुंबई पोलीस आयुक्त नगराळेंनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट
Next Article पंजाबमधील कोरोनाबाधितांनी ओलांडला 2.17 लाखांचा टप्पा
Related Posts
Add A Comment