बेळगाव : सायकलिंग ही त्याची आवड, विश्वशांती हे त्याचे ध्येय आणि हे ध्येय बाळगणारा बेळगावचा सायकलस्वार शुभम नारायण साकेने बेळगाव ते गोवा, परत गोवा ते बेळगाव असा 300 किमी प्रवास करून संदेश देण्याचे काम हाती घेतो आहे. यासाठी आज तो रवाना होईल. कोरोनाच्या महामारीत सर्व जगाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विश्वशांती व विश्वात नवीन बदल घडून यावेत, झाडे लावा-झाडे जगवा, हा संदेश घेऊन बेळगाव ते गोवा व गोवा ते बेळगाव हा 300 किमी प्रवास 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी आज तो गोव्याला रवाना होणार आहे. शनिवार दि. 23 रोजी सकाळी 6 वा. गोवावेस येथे ध्वज उंचावून शुभम आपल्या प्रवासास सुरूवात करणार आहे. तो जांबोटी, बेटणे, कणकुंबी, चोर्ला, चोर्ला घाट, गुंटली, मलगाव, असोना, सिरसम, तेवीम, बागा बीच येथे पोचेल. 24 रोजी गोव्यातील सर्व चर्च व सर्व बीचवर सायकल प्रवास करून संदेश देणार आहे. याच मार्गे तो दि. 25 रोजी बेळगावकडे निघणार आहे.
Previous Articleबेळगावच्या श्रेया पोटेची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी
Next Article नाराजीनंतर सहा मंत्र्यांना फेरखातेवाटप
Related Posts
Add A Comment