संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील विज पुरवठा वांरवांर खंडीत होत आहे. त्यामुळे उमरे प्रादेशिक नळपाणी योजणे अंन्तर्गत येणार्या दहा गावाना गेली पाच ते सहा दिवस पाणी मिळाले नसून भर पावसात पाणी पाणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दहा गावातील ग्रामस्थांना २ ऑगस्ट रोजी पिण्याचे पाणी आले होते .त्यानतंर वांरवांर वीज पुरवठा खंडित होत असल्याने नळपाणी योजणेला पाणीच येत नाही . ग्रामस्थ वापरासाठी पावसाचे पाणी वापरत आहेत पण पिण्यासाठी लागणारे पाणी गृहीणीना ओढ्याचे वा झऱ्याचे आणण्याची वेळ आली आहे.
उमरे नळपाणी योजणे अंतर्गत ऊमरे , कोंडऊमरे. अंत्रवली ,कळंबस्ते , भिमनगर , हाक्रवणे ,मलदे वाडी , फणसवणे आदी दहा गावाना या योजणेतुन पाणी पुरवठा होतो .