डिस्कॉमच्या तोटय़ात 38 टक्क्यांची मोठी घसरण – महसुलातही सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वीज वितरण कंपन्या म्हणजेच डिस्कॉम क्षेत्रावरील संकट दूर होताना दिसून येत आहे. तोटय़ात असलेल्या वीज वितरण कंपन्यांसाठी आता चांगले दिवस दिसू लागले आहेत. डिस्कॉमच्या तोटय़ात 38 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने डिस्कॉमची स्थिती सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली असल्याने त्यांच्या महसुलात सुधारणा होत तोटय़ात घट झाली आहे.
केंद्र सरकारने डिस्कॉमकरता अनेक पावले उचलली असल्याने स्थिती सुधारत आहे. वीज निर्मिती आणि त्यातून प्राप्त उत्पन्नातील अंतर 42 पैशांवरून कमी करत 38 पैशांवर आणले गेल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी दिली आहे.
डिस्कॉमच्या तोटय़ात 38 टक्क्यांची घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये तोटा कमी होत 38 हजार कोटी रुपये राहिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात 61,360 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
राज्यांच्या डिस्कॉमना मानांकन
ऊर्जा क्षेत्र लेंडर पीएसफीने गुजरातच्या 4 डिस्कॉम आणि हरियाणाच्या दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगमला ए प्लस मानांकन दिले आहे. तर आंध्रप्रदेश, राजस्थान, मेघालय, झारखंड, मणिपूर, त्रिपुरा आणि तामिळनाडूच्या 8 डिस्कॉमना सी मानांकन मिळाले आहे. कंपनीचे जोपर्यंत योग्यप्रकारे असेसमेंट होत नाही तोवर सुधारणा शक्य नसल्याचे आर.के. सिंग यांनी म्हटले आहे.
सरकारकडून भेट
केंद्र सरकारने मागील महिन्यात वीज वितरण योजनेसाटी 3.03 लाख्घ् ाकेटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. डिस्कॉमला पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सुधारांकरता ही रक्कम मिळणार आहे.