कोविड सेंटर आणि हाॅस्पिटलचे आँनलाईन पद्धतीने झाले उद्घाटन
वेंगुर्ला- प्रतिनिधी-
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आँनलाईन पद्धतीने उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, कोकणात आरोग्य विषयक सुविधा कमी पडू देणार नाही आवश्यक त्या साधन-सामुग्रीचा पुरवठा होत राहिल.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, जि. प.अध्यक्षा संजना सावंत आदी मान्यवरांनी आँनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवली.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, तालुका प्रमुख यशवंत परब, नगराध्यक्ष दिलिप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शहर प्रमुख अजित राऊळ, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी माईणकर, डॉ. महेश खलिफे, डॉ. अतुल मुळे, विवेक आरोलकर, सुकन्या नरसुले, सचिन वालावलकर मुख्य अधिकारी डॉ. सोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.