प्रतिनिधी/ बेळगाव
पाठीच्या मणक्मयाच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या अनगोळ येथील नऊ वषीय बालकासाठी उद्यमबाग येथील वेगा हेल्मेट समूहाने मदतीचा हात देऊ केला आहे. संचालक गिरीधारी चांडक यांनी 50 हजार तर कर्मचारी वर्गातून 38 हजार 061 असा एकूण 88 हजार 061 रुपयांचा धनादेश त्या चिमुकल्याच्या उपचारासाठी देण्यात आला आहे.
अनगोळ हरिमंदिर येथील स्वयम कमलाकर घाडीगावकर याला पाठीच्या मणक्मयाच्या विकारामुळे चालणेही शक्मय होत नाही. त्याच्यावर पुणे येथील संचेती इन्स्टिटय़ूट ऑफ ऑर्थोपेडिक्स ऍण्ड रिहॅबिलिटेशन या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 5 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने फेसबुक प्रेन्ड्स सर्कलच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. वेगा समूहाने या आवाहनाला प्रतिसाद देऊन ही मदत केली आहे. धनादेश देतेवेळी वेगा हेल्मेटचे व्यवस्थापक विशाल गीते, बसवराज मठपती, फेसबुक प्रेन्ड्स सर्कलचे संतोष दरेकर, स्वयमचे वडील कमलाकर घाडीगावकर उपस्थित होते