वेदांत मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वेदांत सखीतर्फे सोसायटीच्या सभागृहात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून एकल अभियानाच्या समन्वयिका डॉ. वैशाली कित्तूर आणि शांताई वृद्धाश्रमाच्या सह व्यवस्थापिका रेखा बाळेकुंद्री उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सखी गुपच्या अध्यक्षा मंजुषा भेकणे होत्या.
यावेळी डॉ. वैशाली कित्तूर यांनी आजची पिढी आणि संस्काराची गरज, स्त्रियांचे सबलीकरण याविषयी मार्गदर्शन केले. रेखा बाळेकुंद्री यांनी स्त्री आणि कुटुंब याविषयी चर्चा केली. याप्रसंगी वेदांत सोसायटीचे चेअरमन कृष्णा सायनेकर तसेच संचालक सी.ए.अमर चिल्लाळ, सल्लागार जयवंत खन्नूकर उपस्थित होते. पल्लवी सायनेकर आणि श्रीदेवी धामण्णावर यांनी सूत्रसंचालन केले. तर स्नेहल खन्नूकर यांनी आभार मानले. यावेळी सखीच्या सदस्या उपस्थित होत्या.